प्रदुषण एक समस्या मराठी निबंध | प्रदुषण वर मराठी निबंध | essay on pollution in marathi
प्रदुषण एक समस्या मराठी निबंध essay on pollution in marathi :- प्रदुषण ही आज मनुष्याला भेडसावणारी सर्वात मोठी समस्या आहे. या समस्येमुळे माणूस खूप अडचणीत आला आहे. माणसाने तंत्रज्ञानाचा विकास करून आपले दैनंदिन जीवन सुखी तर केले पण यामुळे त्याचे आरोग्य मात्र धोक्यात आले आहे.
आज प्रदुषण ही एक समस्या बनली आहे. त्यामुळे या विषयावर शालेय विद्यार्थ्यासाठी नक्कीच निबंध लिहिण्यासाठी प्रश्न असतो.
आजच्या या पोस्टमध्ये मी तुमच्यासाठी प्रदुषण एक समस्या मराठी निबंध किंवा प्रदुषण वर मराठी निबंध essay on pollution in marathi या विषयावर सुंदर निबंध लिहिला आहे. हा निबंध तुम्हाला नक्कीच आवडेल अशी आशा आहे .
प्रदुषण एक समस्या मराठी निबंध | प्रदुषण वर मराठी निबंध | essay on pollution in marathi
प्रदुषण ही निसर्गाला लागलेली सर्वात मोठी कीड आहे. आज मोठ्या प्रमाणावर निसर्गाचा जो र्हास होत आहे त्याला कारणीभूत म्हणजे हे प्रदुषण आहे. अतिशय सुंदर असणारा निसर्ग आज या प्रदुषण रुपी आजाराने जडला आहे. पण प्रदुषण म्हणजे नेमकं काय ?
हवेत, पाण्यात, वातावरणात असे काही घटक स्थिरावतात की ज्यामुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडते. पर्यावरणाचे संतुलन बिगडवणाऱ्या सर्व घटकांना प्रदूषके असे म्हटले जाते आणि यापासून च प्रदुषण (essay on pollution in marathi) निर्माण होते. आज घडीला प्रदूषणाची मुख्य तीन प्रकार आहेत ते म्हणजे जल प्रदुषण, ध्वनी प्रदुषण आणि हवा प्रदुषण.
मानवाने विकासाच्या हवसापोटी अनेक संशोधन केले, शोध लावले, नवीन तंत्रज्ञान विकसित केले मात्र त्याचबरोबर निसर्गाचा देखील तेवढाच अपव्यव केला. कारखाने, फॅक्टरी, दवाखाने बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड केली. रस्त्याकाठची झाडे तोडून रस्ता रुंदीकरण केले, मोठे मोठे राष्ट्रीय महामार्ग बांधले.
त्यामुळे वनांचे प्रमाण कमी झाले. झाडे तोडल्यामुळे पक्ष्यांची, प्राण्यांची निवस्थाने नष्ट झाली. कित्येक पशू पक्षी दुर्मिळ झाले. पूर्वी मोठ्या संख्येने नियमित दिसणारे पशू पक्षी आज क्वचितच पाहायला मिळत आहेत, ते देखील केवळ अभयारण्यात ! आता जंगलेच उरली नाहीत तर बिचारे पशू पक्षी तरी कसे जगतील ?
झाडे तोडल्यामुळे आणि पशू पक्ष्यांची संख्या झपाट्याने कमी झाल्याने निसर्गाचे चक्र कोलमडले. पूर्वी नियमित पडणारा पाऊस आज क्वचितच पडत आहे. दुष्काळी परिस्थिती उद्भवत आहे. त्सुनामी, चक्री वादळ, भूकंप यासारख्या नैसर्गिक आपत्तीत वाढ झाली आहे.
झाडे कमी झाली, पावसाचे प्रमाण कमी झाले त्यामुळे वातावरणातील उष्णता वाढून ग्लोबल वॉर्मिग सारखी जागतिक समस्या निर्माण झाली आहे.
मानवाने तंत्रज्ञानात खूप प्रगती केली. आज तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक गोष्ट शक्य झाली आहे. जग अगदी जवळ आले आहे. प्रत्येकाचे हातात मोबाईल आहेत हवे तेंव्हा जगातील कोणत्याही व्यक्तीसोबत बोलणे शक्य आहे.
ऑनलाईन शिक्षण पद्धती आली त्यामुळे विद्यार्थ्यांना घरबसल्या शाळा, महाविद्यालये करणे, ऑनलाईन अभ्यास करणे , हवी ती माहिती मिळवणे शक्य झाले आहे. पण मोबाईल हे विकसित तंत्रज्ञान पशू पक्ष्यांच्या जीवावर उठले आहे. या गोष्टीचा आपण कधी विचारच करत नाहीत.
मोबाईल आणि मोबाईलच्या टॉवर मधून निघणाऱ्या आत्मघाती सिग्णलमळे कित्येक पक्षी त्यांचे आयुष्य संपवत आहेत. याच कारणाने आज पक्ष्यांची संख्या झपाट्याने घसरत आहे. पक्षी दुर्मिळ होत चालले आहेत. हे असेच चालू राहिले तर एकदिवस सर्व पशू पक्षी नष्ट होतील.
आज ज्याप्रमाणे आपण डायनासोर ची चित्रे पाहून कल्पना करतो की पूर्वीच्या काळी अश्या प्रकारचा डायनासोर नावाचा एक प्राणी अस्तित्वात होता. त्याचप्रमाणे जर पक्षीच उरले नाहीत तर येणाऱ्या पिढीला पक्षी केवळ चित्रात पाहायला मिळतील. भविष्यात खूपच भयावह परिस्थिती ओढवू शकते.
मानवाने दळणवळणाच्या पद्धतीमध्ये देखील खूप विकास केला. बैलगाडी, घोडागाडी यासारखी पूर्वीची दळणवळणाची साधने संपुष्टात येऊन त्यांची जागा आजच्या आधुनिक तंत्रज्ञान युक्त वाहनांनी घेतली आहे. यामुळे दळणवळण नक्कीच सोयीचे आणि सुलभ झाले आहे. आज या तंत्रज्ञानामुळे जगाला वळसा घालने देखील शक्य आहे.
पण आज याच दळणवळणाच्या साधनांमुळे कित्येक समस्या देखील निर्माण केल्या आहेत. मोटारसायकल, कार, चारचाकी वाहने यामध्ये डिझेल, पेट्रोल यासारख्या इंधनाचा वापर केला जातो. ही इंधने ज्वलणातून कार्बन डायऑक्साइड (CO२), कार्बन मोनॉक्साईड (CO) यासारखी विषारी आणि घातक वायू बाहेर सोडतात.
त्यामुळे वातावरणातील उष्णता वाढून उष्माघाताचा समस्या निर्माण होतात. याच कारणामुळे तपांबर आणि स्थितांबर यासारख्या पृथ्वीच्या आवरणात आढळणारा ओझोन चा थर पातळ होत आहे.
त्यामुळेच सर्याकडून येणारी अतिनील किरणे सरळ पृथ्वीवर पडत आहेत. त्यामुळे अनेक सजीवांना धोका निर्माण झाला आहे. शिवाय यामुळे सजीवांना त्वचेचे रोग देखील होत आहेत. आम्ल पर्जन्य ही देखील यातूनच उद्भवणारी एक समस्या आहे.
प्रदुषण एक समस्या मराठी निबंध essay on pollution in marathi (भाग २)
जल प्रदुषण ही देखील आज घडीला उपस्थित सर्वात भयानक समस्या आहे. यामुळे पृथ्वीवरील पिण्याच्या पाण्याचे प्रमाण कमी तर झालेच आहे शिवाय जे पाणी उपलब्ध आहे ते देखील पिण्यायोग्य राहिले नाही.
मानवाने स्वताच्या विकासापोठी निसर्गाची पर्वा केली नाही. शहरातील सांड पाणी, कारखान्यातून बाहेर पडणारे विषारी द्रव्य, शहरातील घाण सर्रास नदीत, तलावात सोडून दिली. त्यामुळे जलिय प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले. आज पिण्याच्या पाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. दूषित पाण्यामुळे टायफॉइड, कॉलरा यासारखे विविध आजार निर्माण झाले. आज घडीला जल प्रदुषण ही मानवासमोरील सर्वात मोठी समस्या आहे.
शिवाय गाड्यांच्या हॉर्न चा आवाज , कारखान्यातून निर्माण होणारा कर्कश आवाज यापासून निर्माण होणारे ध्वनी प्रदुषण (essay on pollution in marathi) ही देखील सजीवांच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारी समस्या अस्तित्वात आहेच की !
मानवाने खूप विकास केला, माणूस चंद्रावर, मंगळावर पोहचला. पण मानवाने निसर्गाचा विचार करायला हवा होता. तो जशी स्वतःची काळजी घेतो तसेच त्याने निसर्गाला देखील जपायला हवे होते. निसर्गातील साधन संपत्तीचा जपून वापर करायला हवा होता. नाहीतर आज या प्रदूषणामुळे समस्या निर्माण झाल्याचं नसत्या !
मानव आजही परिस्थिती बदलवू शकतो, झालेल्या चुका सुधारू शकतो. झाडे लावून, पशू पक्ष्यांचे संगोपन करून निसर्गाचा समतोल राखू शकतो. पण विकासाच्या मटक्यात आडकलेला मनुष्य या गोष्टी लक्षात घेईल का ? हा सर्वात मोठा प्रश्न आहे.
पण जर निसर्गाचा समतोल राहिला नाही तर भविष्यात पृथ्वीवरील सजीवांच्या अस्तित्वाला नक्कीच धोका आहे, हे देखील माणसाने लक्ष्यात ठेवायला हवे !
मला शेवटी येवढेच म्हणावेसे वाटते –
काम करा लाख मोलाचे, निसर्ग संवर्धनाचे !
टीप : विद्यार्थि मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये मी तुम्हाला प्रदुषण एक समस्या मराठी निबंध essay on pollution in marathi या विषयावर निबंध लिहून दिलेला आहे. हा निबंध सर्व शालेय विद्यार्थ्यासाठी खूप उपयुक्त आहे.
तुम्हाला प्रदुषण वर निबंध essay on pollution in marathi हा निबंध कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. तसेच इतर कोणत्या विषयावर तुम्हाला निबंध लिहून हवा असेल तर ते ही कमेंट करून सांगा, धन्यवाद…!
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
प्रदूषण मराठी निबंध | Essay on Pollution in Marathi
Table of Contents
नमस्कार मित्रांनो आम्ही इथे प्रदूषण मराठी निबंध / Essay on Pollution in Marathi दिला आहे तसेच आम्ही या निबंधामध्ये प्रदुषणाचे सर्व प्रकार दिले आहेत तसेच यामध्येच आम्ही प्रदूषण एक समश्या हा निबंध पण दिला आहे, सोबत प्रदूषणामुळे होणारे नुकसान आणू प्रदूषण टाळण्यासाठीच उपाय देखील या लेखात मी दिले आहे त्यामुळे हा लेख पूर्ण वाचा.
प्रदुषण वरती काय लिहायचे जेवढे लिहील तेवढेच कमी आहे. प्रदूषण हि सर्व जगातीलच एक मोठी समस्या आहे आज आपण याचीच माहिती घेणार आहोत. प्रदुषण या राक्षसाला माणसानेच अन्न पाणी देऊन मोठा केला आहे. जर माणसाने सुरूवातीच्या काळातच या राक्षसाचे मुंडके दाबले आसते तर आज ही वेळच आली नसती. पण अजुनही उशीर झाला नाही आत्ताच आपण या राक्षसाचे मुंडके दाबु आणि याला जमीनीत गाढुन टाकु आणि आपल्या पृथ्वीचे रक्षण या राक्षसापासुन करू.
पण जसे की पुराणात सांगितल्याप्रणाणे एखाद्या शञुसी युद्ध करायचे असेल तर त्याची आधी माहिती घ्या म्हणजे त्याला हारवायला सोपे जाईल त्यामुळे या राक्षसाला हरविण्यासाठी आधी आपण त्याची माहिती घेऊ आणि हो हि माहिती फक्त घ्यायची नाही तर आपल्या जवळच्या आपल्या सैन्याला म्हणजेच नातेवाईक मिञ, भाऊ, बहिण यांना पण सांगायची आणि त्यांना पण या राक्षसाच्या लढाईत समाविष्ट करून घ्यायचे.
सगळ्यात आधी प्रदुषण म्हणजे काय आणि ते कशामुळे होते. साध्या सरळ भाषेत सांगायचे झाले तर निसर्गाच्या एखाद्या गोष्टीत मानवाने हस्तक्षेप करून त्यात वाईट बदल घडवुन आणने म्हणजे प्रदुषण होय. जसे की सांगायचे झाले तर स्वच्छ नदीत गहाण, दुषीत किंवा कारखान्यातील केमीकल युक्त पाणी सोडणे होय. यामुळे काय होते तर पाण्याचा नैसर्गिक स्ञोत आहे त्याचे प्रदुषण होते व ते पाणी प्राणी पक्षी व मानव यांना वापरण्याच्या लायक राहत नाही म्हणजे प्रदुषण फक्त पाण्याचेच होते का आणि त्याचे प्रकार आपण आपण पाहु.
प्रदुषाचे प्रकार / Pollution Types in Marathi
- पाणी प्रदुषण
- हवा प्रदुषण
- भुमी प्रदुषण
- ध्वनी प्रदुषण
1. पाणी प्रदुषण / Water Pollution in Marathi
या मधे मागे पाहिल्याप्रमाणे नैसर्गिक पाणीसाठ्या मधे कारखान्याचे पाणी, मनुष्यवस्तीतील पाणी सोडल्याणे पाणी प्रदुषण होते अनेक कारखाने दुषित पाणी प्रक्रिया न करताच नदीत सोडुन देतात, तसेच मनुष्य वस्तीतील सांडपाणी मोठ्या प्रमाणावर सोडल्यामुळे खुप मोठ्या प्रमाणावर पाणी प्रदुषण होते.
यामुळे नदी, समुद्र, तलाव यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळेच महाराष्ट्रातील अनेक समुद्र किनार्यावर मासे मृत्यमुखी पडले आहेत. आता आपण पाणी प्रदुषण कमी करण्याचे उपाय पाहु.
पाणी प्रदुषणावरील उपाय – नदीत किंवा समुद्रात सोडल्या जाणार्या दुषीत पाण्याला आळा घालणे. जर एखादा कारखाना किंवा कंपनी विनाप्रक्रीया दुषीत पाणी नदीत सोडत आसेल तर आपण शासकीय यंञनेच्या निदर्शणास आणुन देणे तसेच मिडीयाद्वारे त्या प्रश्नास वाचा फोडणे ही आपली जबाबदारी आहे, तसेच आपल्या घरातुन येणारे पाणी गटारीत न सोडता शक्य आसल्यास शोसखड्यात सोडणे.
2. हवा प्रदुषण / Air Pollution in Marathi
हवा ही माणसाला लागणारा अविभाज्य घटक आणि त्यात जर प्रदुषण झाले तर माणसाचे जीवणच अवघड होईल आता हे हवा प्रदुषण होते कशाने याचे मुख्य कारण आहे वाहणातुन निघणारा धुर, तसेच कंपन्यातुन निघणारा धुर, तसेच कचरा जाळणे यामुळे हवा प्रदुषण होते. वाहणामुळे वातावरणात कार्बण डायऑक्साईड हवेत सोडला जातो त्यामुळे तापमाण वाढते. तसेच हा कार्बण डायऑक्साईड ओझोन च्या थरालाही हाणी पोहचवतो.
प्रदुषण मुख्य करून शहरी भागात मोठ्या प्रमाणात आहे दिल्ली सारख्या शहरात हे प्रमाण हाताबाहेर गेले आहे. तसेच जगातील सर्वात ष्रदुशित शहरे भारतात आहेत.
हवा प्रदुषणावरील उपाय – सरकारी यंञना हे प्रदुषण थांबवण्यासाठी प्रयत्न करतेय पण जो पर्यंत्न आपण मनावर घेणार नाही तो पर्यंत त्यांना यश मिळणार नाही म्हणुन आपण पण त्यांना मदत करावी लागेल.
मग आपण काय करायचे जर तुम्ही शहरात राहात असाल तर गाडीचा वापर कमी करायचा शक्यतो सार्वजनिक बस वापरायची आठवड्यातुन एक दिवस तरी गाडी वापरायचे टाळायचे.
जर पर्यायच नसेल तर बॅटरीवर चालणारी वाहणे वापरायची किंवा सायकलचा वापर करायचा आणि शेवटी सगळ्यात महत्वाचे जास्तीत जास्त झाडे लावायची शक्य आसेल तिथे घराजवळ आणि इतरञ झाडे लावा व इतरांना पण सांगा.
3. भुमी प्रदुषण / Land Pollution in Marathi
भुमी प्रदुषणाचे प्रमाण शहरी भागात जास्त आहे कारण शहरात काही ठिकाणी कचर्याची व्यवस्था नसल्यामुळे कचरा इतरञ टाकला जातो आणि भुमी प्रदुषण होते यामुळे जमिणीचा स्तर खालावला जातो आणि या जमिनीची पिके उगवण्याची क्षमता कमी होते.
भुमी प्रदुषणावर उपाय – कचरा शक्यतो कचरा कुंडीतच टाकणे ओला व सुका कचरा वेगळा करणे.
वेगळे ठेवणे घंटा गाडी मध्ये कचरा टाकणे तसेच इतरत्र कचरा टाकणे कटाक्षाने पाळणे तर भुमी प्रदूषण कमी होण्यास मदत होईल तसेच मेडिकल कचरा वर लक्ष ठेवणे जर कचरा इतरत्र दिसला तर शासकीय यंत्रणेला कळवणे.
4. ध्वनी प्रदूषण / Noise Pollution in Marathi
प्रदूषणामुळे होणारे नुकसान.
- हवेच्या प्रदूषणामुळे माणसांना, प्राण्यांना व पक्ष्यांना गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे.
- मानवांना श्वासोच्छवास, दमा, खोकला, त्वचेचे रोग इत्यादी रोगांचा सामना करावा लागत आहे.
- प्रदूषणामुळे ओझोन थर खराब होत चालला आहे, कारण अल्ट्राव्हायोलेट किरण शोषून घेण्याची शक्ती आता कमी होत चालली आहे.
- सूर्यापासून किरणांमुळे लोकांना त्वचेचा कर्करोग होत आहे.
- हववतील प्रदूषणामुळे जगातुल लोकांना फुफ्फुसांशी(LUNGS) संबंधित आजार होऊ लागले आहेत.
- हिवाळ्यामध्ये धुके आणि वायू प्रदूषणामुळे लोकांना नीट दिसत नाही आणि डोळ्यात जळजळ होते.
- वायू प्रदूषण आणि सूर्याच्या उष्णतेमुळे वातावरणात कार्बन डाय ऑक्साईड वायू, नायट्रोजन ऑक्साईड गॅस इत्यादींचा प्रमाण वाढत आहे, जे आपल्या सर्वांसाठी हानिकारक आहे.
- हवेच्या प्रदूषणामुळे ऍसिड रेन बघायला भेटत आहे, जो मानवी जीवनासाठी समस्येची बाब बनली आहे.
प्रदूषण हे एका दिवसात किंवा एखाद्या व्यक्तीकडून ठीक कोण्यासारखी समस्या नाही आहे. मुळापासून प्रदूषण दूर करण्यासाठी, संतुलित लढाई जागतिक स्तरावर लढावी लागेल. जेणेकरून प्रभावी परिणामांची जगात अपेक्षा केली जाऊ शकते. तथापि, बदल घरापासून सुरू होतो, म्हणून जर आपल्याला निसर्ग रडताना पाहू इच्छित नसाल तर आजपासूनच नवीन झाडे लावायला सुरवात करा, धूम्रपान करणे बंद करा, नदी नाल्यांचे पाणी दूषित करू नका व ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी जोरजोराने हॉर्न वाजवायचे बंद करा. अशीच छोटी छोटी पावले जर सगळ्यांनी उचलली तर प्रदूषणावर आला घातला जाऊ शकतो.
मित्रांनो प्रदूषणावर आमचा हा लेख तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या मित्रांसोबत शेअर नक्की करा. तुमच्या कडे सुद्धा प्रदूषण टाळण्यासाठीचे उपाय असतील तर खाली कंमेंट करून नक्की सांगा.
Related Posts:
- शिपाई व हमाल प्रश्नपत्रिका सराव पेपर | Maharashtra…
- [550+] Marathi Suvichar for Students | Good Thoughts…
- पर्यावरण निबंध मराठी | Essay on Environment in…
- महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी | Maharashtra General…
- जाहिरात लेखन टिप्स | Advertisement Writing Tips In…
- दहावी नंतरचे करिअर | Dahavinantar Pudhe kay krayche?
- PSI पूर्व परीक्षा अभ्यासक्रम | PSI Pre Exam Syllabus…
- Aditya L1 mission Information in Marathi | आदित्य एल…
- Online Exam काय आहे? | What is Online Exam in Marathi
- जंगली प्राण्यांची नावे | Name Of Wild Animals In Marathi
नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. हा लेख वाचण्यासाठी खूप खूप आभारी आहे. माझे नाव प्राची पाटील आहे. माहितीदर्शक ही वेबसाइट संपूर्णपणे मराठीमध्ये आपल्या सेवेमध्ये मी तयार केली आहे. या वेबसाइट वरती तुम्हाला शैक्षणिक, आर्थिक, तंत्रज्ञान यांसोबत रोजच्या जीवनात उपयोगी पडणारी मराठी माहिती आम्ही उपलब्ध करुन देत आहोत. जर तुम्हाला आमच्या वेबसाइट वरील कुठल्याही मजकुरामध्ये काही चुकीचे अथवा गैर वाटत असेत तर आमच्याशी संपर्क करा.
Leave a Comment Cancel reply
Save my name, email, and website in this browser for the next time I comment.
IMAGES
VIDEO